तिरूवनंतपुरम : केरळची राजधानी तिरूवनंतपूरम येथील अनेक हॉटेलना बाँबच्या धमकीचे ई मेलद्वारे देण्यात आले आहेत. त्यामुळे बाँबशोधक, नाशक पथक आणि पोलिसांनी आता शोध मोहीम हाती घेतली आहे. कँटोन्मेंट पोलिस ठाण्याने सांगितले की, संशयित ठिकाणांची झडती घेतली जात आहे. ज्या हॉटेलना धमकीचे ई मेल आले आहेत, त्या ठिकाणी पथके तपास करत आहेत. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. ई मेलमध्ये शक्तिशाली स्फोटके ठेवल्याचे नमूद केले आहे. ते कोणी आणि कोठून पाठवले ? याचा तपास आता केला जात आहे अशाच प्रकारची धमकी यापूर्वी विविध सरकारी कार्यालयांना देण्यात आली होती. त्यात जिल्हाधिकारी, महसूल आणि अन्य कार्यालयांचा समावेश होता. केरळ उच्च न्यायालयाला देखील धमकी देण्यात आली होती.
Fans
Followers